Round Table India
You Are Reading
मुलगा पहायला आला
0
Gender

मुलगा पहायला आला

vidya

 

Vidya

vidya

“मुलगा पहायला आला”

 मुलगा पाहायला येतो तेव्हा मुलीला काय वाटत असेल? आज मला मुलगा पाहायला आलेला. मुलगा पाहायला येणं म्हणजे नेमकं काय? जेव्हा मुलगी “वयात येते”, म्हणजे कि ती प्रेम किंवा मुलांशी मैत्री वगैरे करायला लहान असते मात्र लग्न करून संसार करायला समर्थ असते, तेव्हा तिचा बाप (किंवा घरचा करता पुरुष,..हो फक्त पुरुषच ..कारण हा अधिकार बायकांना नाहीच) हा मुलगा शोधतो … अर्थातच जातीचा आणि ‘स्टेटस’ चा (मुलीचं मेंटल, इमोशनल, फिसिकल स्टेटस नाही, ते गेलं चुलीत)..शोधण्याची मोहीम हि वेबसाईटवर तर कमी होते पण काका, मामा, ताईच्या सासऱ्यांच्या बहिणीचा दिराचा मावस भाऊ, अगदी सगळेच, कोणीपण, हे सगळं करतात…काय सुख मिळतं यांना काय माहीत… May be मला वाटतं कि मुलगी वयात आली आहे तर त्यांना sense of pride वाटत असणार कि त्यांनी तिचे कदम “डगमगण्या अगोदरच” तिला वाचवले .. त्यांना कितीही पिण्याचे, दुसऱ्या बायकांचे व्यसन असले तरी मुलीने मात्र स्वतःच्या मनाप्रमाणे मुलगा बघू नये हि त्यांची “निरागस” आशा असते .. असो..

मग मुलगा सुचवायचं कार्यक्रम सुरु झाला कि सर्व decide होत.. मुलगी चुकून नौकरी करत असेल आणि सुट्टी मिळणं अव्हघड असेल या बघण्याच्या कार्यक्रमासाठी तरी ती office मध्ये काही कारण देऊन “स्व-इच्छेने” जाते .. मामा काका भाऊजी या सर्वांना विचारून मात्र दिवस ठरवतात आणि त्या मुलाच्या जॉब प्रमाणे सगळं ठरत कारण कि त्याचा जॉब महत्वाचा .. आणि समजा जर मुलीला जॉब नसेल तर तिला एकाच प्रश्न विचारतात कि “नाश्त्यामध्ये कोणती मिठाई खाशील बाळा? बाप तोपर्यंत मुलाचं नाव पण पूर्ण सांगत नाही कारण कि Facebook वर पोरीने search करू नये म्हणून .. कारण मुलीने उगीच काही “उकरून काढल” तर काय? आणि Facebook तुमचा फक्त चेहरा दाखवत नई तर तुमचे मित्र, लाईक्स, विचार सगळं काही दाखवतं…आणि हे असल काही मुलीला अगोदर कळू नये… मुलीने मुलाला नापसंत केला म्हणजे कि बापासाठी अपमानजनक गोष्ट .. आणि मग मुलीला एवढे superpowers कोणी दिले म्हणून लोकं तोंडात शेण घालतील .. मग आई आत्या यांच्यावर मोठी जबाबदारी असते कि मुलीला नीट नेसावे . असो.

मुलीला पाहुणे आलेत बघायला.. मुलगी शेवटी एक साडी निवडून ती नेसते .. ती नाराज पण नव्हती आणि उत्सुकसुद्धा नव्हती..फक्त हे एकदा सगळं संपायाची वाट बघत असते .. काही दिवसांपासून ती वेगळ्याच दुनियेत होती.. तिला लग्न करायचं नव्हतं .. काहीच interest नव्हता राजा-राणीच्या संसारात .. काही दिवसांपूर्वी जेव्हा तिने लग्न मोडलं होतं तेव्हा तिचं hurt झालेल मन तिला काही विचार नव्हतं करू देत .. सारखं वाटायचं कि जो त्रास दिला अगोदरच्या मुलाने दिला होता तोच त्रास पुन्हा झाला तर.. हो तिच होणारं लग्न मोडलाय याआधी .. मुलाला virgin मुलगी हवी होती .. त्या मुलाने त्या मुलीला अगदी अगोदरच सर्वात पहिले हेच विचारले कि ती virgin आहे कि नाही .. तिने त्याला सगळं काही खरा सांगितलं आपल्या अगोदरच्या प्रेमाबद्दल .. पण मुलाला फक्त virgin कि नाही हेच ऐकायचं होत..तिने त्याला तसं सांगितलं …कि नाहीये.. . मुलगा थोडा शॉक झाला पण लगेच म्हणाला कि आपण हॉटेल मध्ये रात्रभर राहायला काही हरकत नाही, लग्न तर ठरलेच आहे .. काही दुसर बोलण्या अगोदर मुलाचा हा ‘आग्रह’.. तिने जेव्हा घरच्यांना हे सांगितलं तेव्हा घरच्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं .. उलट म्हणाले कि नाही म्हणालीस त्या मुलाच्या “आग्रहाला” म्हणून आता त्यांचा ‘ego hurt’ झाला असेल.. हि त्यांची काळजी.. अश्या मुलाला जवळ कधीच घ्यायचं नाही असं ठरवून त्या मुलाला नकार दिलाच.. कोणी नातेवाईक सोबतीला आले नाही पण काही मित्र सोबत आले आणि त्या मुलाला शिव्या देऊन लाथ मारून आयुष्यातून बाहेर काढलं .. इतक सगळं झालं ..आणि लगेच २ महिन्यात बापाचं नवीन मुलगा पाहायला सुरुवात .. तेच चक्र पुन्हा सुरु झाले..पण आता लिहायचे थांबवते.. कारण मुलगा पाहायला आलाय .. 

~~~

 

Vidya is a young professional from Maharashtra.

Image Courtesy: The Internet